अरुण गाडगीळ : “ ‘मौज’ने मराठी प्रकाशन विश्वामध्ये अढळ स्थान प्राप्त केले आहे. आणि या संस्थेचा मी दीर्घकाळ घटक होतो, याचा मला मनस्वी आनंद आहे.”
प्रत्येक लेखकाला आपले एकतरी पुस्तक ‘मौजे’ने काढावे असे वाटत असे. प्रकाशक म्हणून या काळात ‘मौजे’ची सॉलिड वट होती.
हा ‘मौज’चा जो दबदबा होता, त्याचा फायदा मला कायमच मिळत असे. मी कोणालाही भेटायला गेल्यावर माझे (प्रतिनिधी, मौज प्रकाशन) कार्ड आत पाठवत असे. ते बघून लगेच आत बोलवले जाई. मला महाराष्ट्रभर असा मान नेहमीच मिळत आला आहे. या संस्थेने मराठी प्रकाशन विश्वामध्ये अढळ स्थान प्राप्त केले आहे.......